वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या 'मिनी पीएमओ'लाच ओएलएक्सवर काढले विक्री

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय विक्री असल्याची जाहिरात ओएलएक्स या जुन्या वस्तू विकणाऱ्या संकेतस्थळावर झळकली. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. याप्रकरणी पोलिसांनी चार लोकांना अटक करत ही जाहिरात काढून टाकली आहे.  

वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय विक्री असल्याची जाहिरात ओएलएक्स या जुन्या वस्तू विकणाऱ्या संकेतस्थळावर झळकली. यानंतर एकच चर्चा सुरू झाली. याप्रकरणी पोलिसांनी चार लोकांना अटक करत ही जाहिरात काढून टाकली आहे.  

दरम्यान, सविस्तर वृत्त असे की, ओएलएक्स या संकेतस्थळावर मोदींचे जनसंपर्क कार्यालयाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात मोदींच्या नावाचा बोर्डही दिसत आहे. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कार्यालयाच्या आतील खोल्या तसेच पार्किंगबाबतही माहिती देण्यात आली आहे. यात हाऊसेड एंड व्हिला, चार बेडरूम या बरोबरच व 6500 वर्ग फूट बांधकाम झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रोजेक्टच्या नावाच्या जागी पीएमओ ऑफिस, वाराणसी असा मजकूर लिहिला होता. या जाहिरातीत लक्ष्मीकांत ओझा असे विक्रेत्याचे नाव लिहिले होते.     

उत्तर प्रदेश पोलिस याबाबत काय म्हणाले? 

वाराणसीचे खासदार मोदी यांचे जनसंपर्क कार्यालय भेलुपूर भागातील जवाहर कॉलनीमध्ये आहे. याप्रकरणी वाराणसीचे पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, '17 डिसेंबर गुरूवारी आम्हाला पीएम ऑफिसचा फोटो ओएलएक्सवर टाकला गेला असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत तात्काळ भेलुपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनाक्रमात सामील असलेल्या चार आरोपींना अटक करण्यात आली. हा फोटो संकेतस्थळावर पोस्ट करणाऱ्याच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या