West Bengal Election: "निवडणूक हरण्याच्या भीतीने ममता बनर्जी व्हीलचेअरवर"

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या व्हील चेअर वापरण्यावर टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय खडाजंगी होताना पाहायला मिळते आहे. ५ राज्यांच्या निवडणूका सुरु असताना देशाचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागून असल्याचे दिसते आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या व्हील चेअर वापरण्यावर टीका केली आहे. (Narottam Mishra has criticized Mamata Banerjee's use of a wheelchair.)

पश्चिम बंगालच्या 294 विधानसभांच्या जागांसाठी सध्या निवडणूका सुरु आहेत. या निवडणुकी दरम्यान झालेल्या एका घटनेत ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आणि पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्या सध्या व्हील चेअर वापरत असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र त्यांच्या व्हील चेअर वापरण्यावर ता भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने टीका केल्याचे पाहायला मिळते आहे. नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच पंजाबचे बहुजन समाज पक्षाचे नेते मुख्तार अन्सारी हे भीतीमुळे व्हील चेअर वापरत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. एक जण निवडणूक हरण्याच्या भीतीने तर एकजण मार खाण्याच्या भीतीने व्हील चेअर वापरत असल्याचे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर टीका केली आहे. 

West Bengal Election : ममता बॅनर्जी याना निवडणूक आयोगाचा झटका

पश्चिम बंगालच्या (West Bengal) आसनसोल मध्ये प्रचार सभेला (Election Campaign) संबोधित करत असताना नरोत्तम मिश्रा यांनी हे विधान केले आहे. पश्चिमी बंगालच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) सध्या जोरदार घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. 

संबंधित बातम्या