NASA Artemis 1 Launch: NASA चे मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच

NASA Artemis 1 Launch: मंगळ मोहिमेनंतरची आर्टेमिस-1 ही मोहीम नासाची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे.
NASA Artemis 1 Launch
NASA Artemis 1 LaunchDainik Gomantak

अमेरिकेच्या 'नासा' (NASA) ने मून मिशन 'आर्टेमिस-1' यशस्वीरित्या लॉंच केले आहे. हे प्रक्षेपण आज फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आले आहे. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे. आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची महत्त्वाची मोहीम आहे.

नासा या मिशनच्या माध्यमातून ओरियन अंतराळयान चंद्रावर पाठवत आहे. हे यान 42 दिवसांत चंद्रावर प्रवास केल्यानंतर परत येणार आहे. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

  • मंगळ ग्रहाचा प्रवास

आर्टेमिस-1 मोहिमेदरम्यान ओरियन आणि एसएलएस रॉकेट चंद्रावर पोहोचेल आणि 42 दिवसांत पृथ्वीवर परत येणार. जर हे मिशन यशस्वी झाले तर, 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच नासाचे (NASA) शास्त्रज्ञ चंद्रावर (Moon) पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरून चंद्राच्या पलीकडे जाऊन मंगळाचा प्रवासही करता येणार.

  • नासाचे आर्टेमिस-1 मून मिशन

अमेरिका (America) आपल्या मून मिशन आर्टेमिसच्या माध्यमातून तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्यास सज्ज आहेत. आर्टेमिस-1 हे या दिशेने पहिले पाऊल आहे. ओरियन अंतराळयान मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी बनवण्यात आले आहे. हे यान प्रथम पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 4.50 लाख किमी प्रवास करेल. एवढा लांब प्रवास करणारे ओरियन अंतराळयान (Space) हे पहिले अंतराळयान असेल.

दरम्यान, मुख्य मून मिशनसाठी हे एक चाचणी उड्डाण आहे. ज्यामध्ये एकही अंतराळवीर पाठवला जाणार नाही. या उड्डाणामुळे चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही? हे जाणून घेण्याचे शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे. तसेच, चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का? हे देखील पाहण्यात येईल

  • 42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांचे मिशन

नासाची 'स्पेस लॉंच सिस्टम (SLS) मेगारॉकेट' आणि 'ओरियन क्रू कॅप्सूल' चंद्रावर पोहोचतील. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात, परंतु यावेळी ते रिक्त असेल. हे मिशन 42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांचे आहे. त्यानंतर ते पृथ्वीवर परतणार आहे. हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटर अंतर कापणार आहे.

  • अनेकदा आले अयशस्वी

काही दिवसांपूर्वीच नासाला आपले बहुप्रतिक्षित मिशन आर्टेमिस-1 मागे घ्यावे लागले होते. नासाने हे मिशन पुढे ढकलून ते व्हेईकल असेंबली बिल्डिंग (VAB) मध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com