जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Lata Mangeshkar Passes Away
Lata Mangeshkar Passes AwayDainik Gomantak

गोवा: जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

(national condolence to be observed owing to demise of veteran singer lata mangeshkar)

Lata Mangeshkar Passes Away
काब्रालबाब हे वागणं बरं नव्हं! खरी कुजबूज
pc
pcDainik Gomantak

लतादिदींना कोरोनासोबतच (COVID-19) न्यूमोनियाची लागण झाली होती. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार, तसेच सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लता मंगेशकर यांची कारकीर्द

सात दशकांच्या दीर्घ गायन (Singer) कारकिर्दीत, लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका होत्या. लतादीदींना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तो 'ये कहां आगे हम', 'प्यार किया तो डरना क्या', 'दिल अपना' आणि 'अजीब दास्तान है ये', 'ए मेरे वतन के लोगों' आणि 'लग जा गले' मधील मुगल-ए-आझममधील आहे. प्रीत परा.' इतर अनेक आयकॉनिक गाणी त्यांनी गायली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com