दिल्लीत फटाके फोडायला मनाई; इतर राज्यांमध्ये मात्र एक दिवस मुभा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

पोलिसांनी कडक बंदोबस्त करत फटाके बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

नवी दिल्ली- राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली एनसीआरमध्ये ९ ते ३० नोव्हेंबरपर्यंत फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणले आहेत. इतर राज्यांसाठी मात्र लवादाने तेथील हवा चांगली असून तेथे दिवाळीच्या दिवशी ग्रीन फटाके फोडायला हरकत नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त करत फटाके बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

 अशातच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्याचा व्यापार करणारे अडचणीत आले आहेत. तमिळनाडूमधील शिवाकाशीमध्ये याबाबत अधिक नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. कारण देशात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांपैकी ८० टक्के फटाके येथेच तयार केले जातात. फटाक्यांच्या या व्यवसायातून सुमारे ५ लाख लोकांना रोजगार मिळतो.   
 
ऑल इंडिया फायरवर्कस असोशिएशनच्या माहितीनुसार शिवाकाशी येथे १०७० कंपन्यांची नोंद असून एकट्या शिवाकाशीत मागील वर्षी ६ हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. संपूर्ण देशाच फटाक्याच्या व्यवसायाची उलाढाल ९ हजार कोटी इतकी आहे. शिवाकाशीमध्ये या व्यवसायात ३ लाख लोक सामील आहेत. तर एकूण ५ लाख लोकांना यातून रोजगार मिळतो. 

संबंधित बातम्या