सिगारेट थोटक्यांचे विघटन करा

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

नियमावली तयार करण्‍याचे राष्‍ट्रीय हरित लवादाचे निर्देश : तीन महिन्‍यांची दिली मुदत

पणजी: राष्ट्रीय हरित लवादाच्या तीन सदस्यीय समितीने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सिगारेट आणि विडीच्या थोटक्यांच्या विघटनाबाबत नियमावली तयार करण्यासाठीचा आदेश दिला आहे. ही नियमावली येत्या तीन महिन्यांच्या आत तयार होणे अपेक्षित आहे, असेही निर्देश दिले आहेत.

 या समितीमध्ये न्या. आदर्शकुमार गोयल, सोनम फिंतसो वांगडी आणि डॉ. नागीण नंदा यांचा समावेश आहे.

संबंधित आदेश २०१५ साली ‘डॉक्टर्स फॉर यू’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान देण्यात आला. २०१५ साली केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खाते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, केंद्रीय व्यापार आणि उद्योग खाते, तंबाखू महामंडळ तसेच अन्य संबंधित खात्यांना नोटिसा पाठविण्यात आल्‍या होत्‍या. याविषयी प्रतिक्रिया देताना केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याने सांगितले की, सिगारेट आणि विडीची थोटके आरोग्यासाठी हानीकारक असणाऱ्या गोष्टींच्या यादीमध्ये नाहीत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार तंबाखू हे आरोग्यास अपायकारक घटक आहेत. 

सिगारेट आणि विडीची थोटके अविघटनशील आहेत. आणि या थोटक्यांचा पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. लवादाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय विषजन्य पदार्थ संशोधन संस्थेला दिलेल्या आदेशानुसार, त्यांनी या विषयाचे संशोधन केले. आणि त्यांनतर असे सांगितले की, ही थोटके पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी निर्धारित प्रमाणापेक्षा कमी विषारी आहेत. लवादाच्या म्हणण्यानुसार, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक आहेत. म्हणून थोटक्यांच्या विघटनाबाबत नियमावली असणे आवश्यक आहे.होणारी दलाली आणि लॉजिस्टिक्स खर्च यासारख्या अन्य प्रणालीतील अकार्यक्षमता दूर करण्यात देखील मदत करेल. उदाहरणार्थ, पंजाब, उत्तर हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधील १००० हून अधिक बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी टेक्निको अ‍ॅग्री सायन्सेस लिमिटेड (आयटीसीची साहाय्यक कंपनी) सोबत केलेल्या करारानुसार उत्पादनात १० टक्के ते ३० टक्के आणि किमतीपेक्षा ३५ टक्के जास्त फायदा प्राप्त केला आहे. 

नवकल्पनांना वाव
पारंपरिक कृषी व्यवसायातील गुंतवणुकीच्या पलीकडे, बाजारातील सुधारणा या क्षेत्रात नवकल्पना आणतील आणि नवीन व्यवसाय मॉडेल्स विकसित करण्यास अनुमती देतील. शेती व्यवस्थापन सेवा, दर्जेदार प्रतवारी आणि कसोटी सेंटर, ‘अ’ दर्जाच्या वखार/गोदाम कंपन्या, डिजिटल बाजारपेठ हे वेगवेगळे व्यवसाय सध्या नवीन असले तरीदेखील ते वाढत आहेत. उदाहरणार्थ, ३००हून अधिक क्षेत्रातील आणि ३० अधिक देशांमधील स्टार्टअपमधील गुंतवणुकीचा आणि ट्रेंडचा अभ्यास करणाऱ्या ‘ट्रॅक्सन’ या जागतिक व्यासपीठाने आपल्या अहवालात अशी नोंद केली आहे की, २०१८पासून शेती साधने आणि सेवा, शेती बाजारपेठ, लॉजिस्टिक्स आणि साठवणूक या क्षेत्रात भारतीय कृषी स्टार्टअप्सची सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या निधीत १५ कोटी डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. 

कृषी क्षेत्राच्या उदारीकरणामुळे, नवीन व्यवसाय मॉडेल अधिक गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. शेती व्यवस्थापनातील नवकल्पना उत्पादकता वृद्धिंगत करतील, पीक कापणीनंतरच्या व्यवस्थापनात सुधारणा केल्यामुळे पीक वाया जाणार नाही, डिजिटल बाजारपेठा शेतकऱ्यांचा आवाका आणि बाजारपेठेतील संबंध आणि इतर बाबी वृद्धिंगत करतील.

कृषी क्षेत्रात खासगी भांडवल
बाजारातील सुधारणांमुळे कृषी क्षेत्रात खासगी भांडवल येईल आणि  ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामुळे लॉजिस्टिक्स सेवा प्रदाता, गोदाम चालक, प्रक्रिया युनिट कर्मचारी इत्यादी संबंधित क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होतील. आम्ही शेतीमध्ये पुढील अनेक पिढ्यांसाठी नोकरीच्या संधी पाहत आहोत - शेतकऱ्यांची मुले आता नोकरीच्या मोठ्या  संधींसाठी शहरांमध्ये न जाता, खरेदी व विपणनासाठी एफपीओ मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक बनण्याची इच्छा बाळगू शकतात. एकंदरीत, बाजारातील सुधारणेमुळे अनेक सामाजिक-आर्थिक फायदे होतील.

(लेखक विद्यमान संरक्षणमंत्री आणि माजी कृषीमंत्री आहेत)

संबंधित बातम्या