'आम्ही मोदींना घाबरत नाही' : National Herald ऑफिस सील केल्यानंतर राहुल गांधीचा सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत राहुल यांनी पुन्हा एकदा मोदी-शहा लोकशाहीच्या विरोधात काम करत असल्याचं म्हटलं आहे.
rahul gandhi
rahul gandhiDainik Gomantak

Rahul Gandhi Slams BJP: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील नॅशनल हेराल्ड इमारत सील करण्यावरुन आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या यंग इंडिया लिमिटेड ​​कार्यालयाला केलेल्या बॅरिकेटींगवरुन भाजप सरकरावर हल्लाबोल केला आहे. अजून बॅरेकेटिंग करा, यातून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कितीही काही करा, आपण घाबरणार नाहीत. सत्य झाकून ठेवता येणार नाही, असे म्हणतं राहुल गांधी यांनी मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

rahul gandhi
National Herald कार्यालयावर EDचा छापा, सोनिया अन् राहुल गांधींच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत राहुल यांनी पुन्हा एकदा मोदी-शहा लोकशाहीच्या विरोधात काम करत असल्याचं म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण लढत राहू, त्याचबरोबर देशाचे रक्षण आणि समाजात एकोपा टिकवून ठेवण्याचे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच सरकारला जे काही करायचे आहे ते करा, असे आव्हान त्यांनी केले.

rahul gandhi
National Herald Case: यंग इंडियाचे कार्यालय ईडीने केले सील

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड कार्यालयाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले असून इमारतीचा काही भाग सील केला आहे. सील केलेला भाग त्यांच्या परवानगीशिवाय उघडला जाणार नाही, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. ईडीच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची संभाव्य कामगिरी लक्षात घेता पक्षाच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. यावर राहुल गांधी यांचे वक्तव्य आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com