National Herald Case: सोनिया गांधींची ईडी चौकशी पूर्ण, तीन दिवसांत 11 तास चौकशी

Money Laundering Cases: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे.
Sonia Gandhi
Sonia GandhiDainik Gomantak

National Herald Case: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. ईडीने आज त्यांची सुमारे तीन तास चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांना ईडीकडून कोणतेही नवीन समन्स बजावण्यात आलेले नाही. सोनिया गांधी यांची तीन दिवसांत 11 तास चौकशी करण्यात आली.

दरम्यान, 75 वर्षीय सोनिया गांधी यांची ईडी ( Directorate of Enforcement) ने मंगळवारी सहा तास चौकशी केली आणि आज पुन्हा हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी 21 जुलै रोजी ईडीने त्यांची दोन तास चौकशी केली होती. ही चौकशी 'नॅशनल हेराल्ड' या वृत्तपत्राच्या मालकीच्या 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत कथित आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांशी संबंधित आहे.

Sonia Gandhi
National Herald Case: राहुल गांधींना घेतले ताब्यात "देशात पोलिस राज, मोदीजी राजा..."

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड फ्रेंडली प्रोटोकॉलचे पालन करुन चौकशी सत्र आयोजित केले जात आहे. त्याचबरोबर त्यांचा जबाब ऑडिओ-व्हिडिओ माध्यमातून रेकॉर्ड केला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध एजन्सीच्या कारवाईचा निषेध केला आहे. त्याचबरोबर या कारवाईस “राजकीय सूड आणि छळ” असेही म्हटले आहे.

राहुल गांधींना सवाल विचारले

याप्रकरणी ईडीने (ED) गेल्या महिन्यात राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. पाच दिवसात त्यांची 50 तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. ईडीने गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी तरतुदींखाली नवीन गुन्हा नोंदवला होता, त्यानंतर गांधी कुटुंबाची चौकशी करण्यात आली.

Sonia Gandhi
National Herald Case: काँग्रेस नेत्या आक्रमक; थेट धरली पोलीसाची 'कॉलर'

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 2013 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे येथील एका ट्रायल कोर्टाने यंग इंडियनविरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल घेतल्यानंतर ईडीने हा गुन्हा नोंदवला.

तसेच, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि भागधारक आहेत. राहुल यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांचीही कंपनीत 38 टक्के हिस्सेदारी आहे.

Sonia Gandhi
National Herald Case: सलग तिसऱ्या दिवशी होणार राहुल गांधींची ईडी चौकशी

शिवाय, स्वामी यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि इतरांविरुध्द फसवणूक आणि पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com