National Highway: राजनाथ आणि गडकरी हवाई दलाच्या ट्रॅकचे करणार उद्घाटन

2016 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हवाई विमान लँडिंग होवू शकते का? यावर संरक्षण मंत्रालय आणि भारतीय हवाई दल यांच्यासह एक आंतर-मंत्रिस्तरीय संयुक्त समितीची घोषणा केली.
Indian Air Force
Indian Air ForceDainik Gomantak

दिल्ली: जर्मनी, स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलँड, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरसह अशा अनेक देशामध्ये आपत्कालीन परिस्थिती आल्यास रस्त्यावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी त्यांनी महामार्गांवर ट्रॅक बनवले आहेत. राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्गावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)या आठवड्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाने लँडिंग करणार आहेत. मात्र त्या आधी देशातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गावर बांधलेल्या 3.5 किमी लांबीच्या हवाई ट्रॅकचे उद्घाटन करतील.

Indian Air Force
एफसी गोवाचा लढाऊ बाणा कौतुकास्पद

दोन समान हवाई पट्ट्या राष्ट्रीय महामार्गावर बांधलेल्या असून त्या आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh)पूर्ण झाल्या आहेत. तसेच पश्चिम बंगाल आणि जम्मू -काश्मीर येथील महामार्गावर प्रत्येकी एक हवाई ट्रॅक बांधला जात आहे. भारताच्या राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारच्या नवीन चार हवाई ट्रॅक बांधण्याची निविदा काढण्यात आली आहे. भारतातील एकूण २८ राष्ट्रीय महामार्गांवर (National Highways)लढाऊ विमानाद्वारे आपत्कालीन लँडिंगसाठी एअरस्ट्रीप विकसित करण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे. तसेच या महामार्गाच्या जमिनीची आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ विविध ठिकाणी भेटी देत आहेत. जम्मू -काश्मीर, पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालसह राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ त्यांची तपासणी झाली असल्याचेही समजते.

तसेच, 2016 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या महामार्गावर ते हवाई विमान लँडिंग होवू शकते का यावर संरक्षण मंत्रालय आणि भारतीय हवाई दल यांच्यासह एक आंतर-मंत्रिस्तरीय संयुक्त समितीची घोषणा करण्यात केली आली. सध्या असाच एक नवीन ट्रॅक उत्तर प्रदेशातील लखनौ-आग्रा एक्सप्रेसवे वर कार्यरत आहे. जर्मनी, स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलँड, स्वित्झर्लंड आणि सिंगापूरसह अनेक देशांनी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरण्यासाठी आणि उड्डाण करण्यासाठी त्यांच्या महामार्गांवर आणि एक्सप्रेसवे वर तयार करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com