''राष्ट्रीय तपास संस्थांचा एवढा वापर य़ापूर्वी कधीही करण्यात आला नव्हता''

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा एवढा वापर यापूर्वी कधीही करण्य़ात आला नव्हता अस म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक मुद्द्यांवर एकदम प्रखरपणे भूमिका मांडणारा आणि आपल्या विधानामुळे कायमच चर्चेत असणारा प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. दोघांच्या मुंबईतील मालमत्तावर छापेमारी करत तपासास सुरुवात केली. त्यांच्यासह आणखी 20 जणांच्या विरोधात आयकर विभागाने छापे टाकत तपास वाढवला आहे. या कारवाईवर शंका उपस्थित करत जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा एवढा वापर यापूर्वी कधीही करण्य़ात आला नव्हता अस म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.

सरकारच्या मतांपेक्षा वेगळं मत मांडणं देशद्रोह ठरत नाही

जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी, ''तापसी आणि अनुराग यांच्याविरोधात आयकर विभागाने केलेल्या कारवाईची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपची ए टीम कामाला लागली आहे. आपल्य़ा इच्छाप्रमाणे न वागणाऱ्य़ा त्रास द्या, धमकावा आणि त्या व्यक्तींना गप्प करा. भारताने यापूर्वी इतक्या सुडबुध्दीने आयकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेचा वापर यापूर्वी कधीही पाहिला नाही, अशा अर्थाचं ट्विट भूषण यांनी केलं आहे.

अनुराग, तापसी यांच्यासह आयकर विभागाने मधु मंटेना, विकास बहल यांच्याही मालमत्तावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कराची चोरी केल्याच्या आरोपाखाली यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे आयकर विभागाद्वारा सांगण्यात आले आहे. आयकर विभागाने मुंबईतील आणखी 22 ठिकाणी छापोमारी केली आहे.   

 

संबंधित बातम्या