औषधी उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयोगशाळा

Pib
गुरुवार, 11 जून 2020

रायबरेलीच्या NIPER संस्थेतही संचालकपदाची धुरा तेच सांभाळत असल्याने तेथील सादरीकरणही त्यांनीच केले. गुवाहाटी आणि हाजीपूरच्या NIPER च्या संचालकांनीही आप-आपल्या संस्थांसाठी सादरीकरण केले.

नवी दिल्ली, 

मोहाली, रायबरेली, हाजीपूर आणि गुवाहाटी येथील NIPER म्हणजेच राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या संचालकांबरोबर, रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री श्री.मनसुख मांडवीय यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक आढावा बैठक घेतली. कोविड-19 या साथरोगाचा सामना करण्यासाठी या संस्था संशोधन आणि अभिनव संकल्पनांद्वारे देत असलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या कामगिरीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

 

 

संशोधन आणि चाचण्यांशी संबंधित उपक्रमांमार्फत NIPER संस्था आपली स्वतःची संसाधने निर्माण करून स्वयंपूर्ण होऊ शकतात, यावर श्री.मांडवीय यांनी यावेळी बोलताना भर दिला.

तसेच, NIPER संस्थांनी उत्पादने विकसित करण्यापलीकडे जाऊन व्यापारी तत्त्वावर त्यांच्या उत्पादन व विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या संधीचाही प्राधान्याने विचार केला पाहिजे,असे प्रतिपादनही त्यांनी केले.

सर्व NIPER संस्थांनी औषधी उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यासाठी उत्पन्न मिळविण्याचा एका मार्ग तयार होईल. या तपासणी / चाचणी प्रयोगशाळांचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करून घेण्यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील औषधनिर्मिती कंपन्या NIPER संस्थांशी संपर्क साधू शकतील.

विविध NIPER संस्थांनी मांडलेल्या मुद्यांवर बोलताना श्री. मांडवीय यांनी सदर मते मांडली. NIPER संस्थांपैकी मोहालीच्या NIPER च्या संचालकांनी पहिले सादरीकरण केले. संस्थेने संशोधन आणि विकासाच्या तसेच औषधशिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या यशस्वी कामगिरीचा आलेख त्यांनी यावेळी मांडला. 

संबंधित बातम्या