रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 60.86% पर्यंत

pib
मंगळवार, 7 जुलै 2020

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ 

नवी दिल्ली, 

कोविड उपचार आणि व्यवस्थापनातली देशातली लक्षणीय उपलब्धी म्हणजे, कोविड-19 च्या आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या आता 1 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

यावरून, देशव्यापी चाचण्यांना देण्यात आलेले प्राधान्य लक्षात येत असून, “टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट’ म्हणजेच, चाचण्या-संपर्कशोध आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जातो आहे, त्याशिवाय, सर्व घटकांकडून वारंवार पाठपुरावा करत, त्यानुसार धोरणात बदल करण्याच्या केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या भूमिकेचे परिणामदिसत आहेत.  

गेल्या 24 तासांत, देशात 3,46,459 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या आता, 1,01,35,525 इतकी झाली आहे.

देशभरात चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढवण्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसतो आहे. आजपर्यंत देशात कोविडसाठी एकूण 1105 प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यातल्या 788 प्रयोगशाळा सरकारी असून 317 प्रयोगशाळा खाजगी आहेत.

या प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 च्या निदानासाठी होणाऱ्या विविध चाचण्या पुढीलप्रमाणे :--

  • रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 592 (सरकारी: 368 + खाजगी: 224)
  • TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 421 (सरकारी: 387 + खाजगी: 34)
  • CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 92 (सरकारी: 33 + खाजगी: 59)

कोविड-19 चे प्रतिबंधन आणि व्यवस्थापन यासठी केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आजपर्यंत देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याची संख्या 4,24,432 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात कोविडचे  15,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.  

कोविडच्या  सक्रीय रुग्णांच्या तुलनेत, बरे झालेल्या रुग्णांची संख्या  1,71,145 इतकी अधिक आहे.  यामुळे, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 60.86% इतका झाला आहे.

सध्या देशांत कोविडच्या 2,53,287 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ 

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा:  technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी-  ncov2019@gov.in.

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.

 

संबंधित बातम्या