कोविड-19 बाबत संशोधनात राष्ट्रीय संशोधन केंद्र अग्रेसर

Pib
शनिवार, 9 मे 2020

केंद्रातील वैज्ञानिक आणि तज्ञ संशोधकांनी कोविड–19 संसर्गाविषयी सावधानता बाळगण्यासाठी गृह व्यवहार मंत्रालयाने परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याविषयी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत संशोधन विषयक काम करताना विविध प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विश्लेषणात्मक कार्य केले आहे.

नवी दिल्ली, 

सध्या जगभर पसरलेल्या कोविड – 19 महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी देशात सुरु असलेल्या लढ्यात एनसीपीओआर अर्थात ध्रुवप्रदेश आणि महासागर यांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने सक्रीय सहभाग नोंदविला आहे. या केंद्रातील वैज्ञानिक आणि तज्ञ संशोधकांनी कोविड–19 संसर्गाविषयी सावधानता बाळगण्यासाठी गृह व्यवहार मंत्रालयाने परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याविषयी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत संशोधन विषयक काम करताना विविध प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विश्लेषणात्मक कार्य केले आहे. संशोधकांनी कोविड–19 प्रादुर्भावामुळे देशात लागू झालेल्या संपूर्ण बंदीचा उपयोग या वैज्ञानिक आणि तज्ञ कोविड विषाणू संसर्गाविषयी उपलब्ध असलेल्या संशोधनात्मक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी करून घेतला असून आगामी काळात अनेक संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द होतील अशी अपेक्षा आहे. संपूर्ण बंदी काळात संशोधन कार्यात समकक्ष संस्थांचा सहभाग मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतला गेला आहे. एनसीपीओआरने भूविज्ञान मंत्रालयासह पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्था, चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद येथील राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, थिरूवनंतपुरम येथील राष्ट्रीय भू-विज्ञान अभ्यास केंद्र या संस्था तसेच इस्रोचे बेंगळूरू येथील मुख्यालय, अहमदाबादमध्ये असलेले अवकाश उपयोजन केंद्र आणि हैदराबाद स्थित राष्ट्रीय दूर-संवेदना केंद्र या संस्थांमधील वैज्ञानिक तसेच संशोधकांशी विविध ऑनलाईन मंचांचा वापर करून अधिकृत बैठका घेतल्या. भू-विज्ञान मंत्रालयाने संपूर्ण बंदी कालावधीत वेळोवेळी आयोजित केलेल्या वेबिनार आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन एनसीपीओआरच्या संशोधकांनी त्यांचे विचार मांडले आहेत.

एनसीपीओआरच्या सर्व 90 आऊटसोअर्स कामगारांना त्यांच्या उपस्थितीचा विचार न करता संपूर्ण वेतन दिले आहे. केंद्रात बांधकाम करणाऱ्या 40 कामगारांची राहण्याची सोय केंद्रातच करण्यात आली असून त्यांच्या आरामदायी निवासासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व 30 सुरक्षा रक्षकांना मास्क आणि रबरी हातमोजे पुरविण्यात आले आहेत. एनसीपीओआरच्या कर्मचारीवर्गाची घर ते केंद्र अशी ने – आण करण्यासाठी बसची व्यवस्था केली असून प्रवासादरम्यान कोविड–19 संसर्गाविषयी सावधानता बाळगण्यासाठी गृह व्यवहार मंत्रालयाने परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याविषयी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. गोवा राज्यात कोविड-19 संसर्ग नियंत्रणाच्या कार्यात मदत करण्यासाठी एनसीपीओआरचे एक वाहन दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तैनात करण्यात आले आहे.

महासागराविषयी संशोधन करणाऱ्या सागर निधी या जहाजावर संशोधन कार्य करणाऱ्या दोन अमेरिकी शास्त्रज्ञांना गोवा सरकारच्या पाठबळ आणि सहकार्याने एनसीपीओआरचे अधिकृत वाहन वापरून सुरक्षितपणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचविण्यात आले. संस्थेत प्रबंध सादर करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्पाचे काम संपले आहे अशा विद्यार्थ्यांना गोवा आणि केरळ राज्य सरकारांच्या मदतीने केरळ राज्यातील त्यांच्या मूळ गावी सुरक्षितपणे  पोहोचण्याची सोय केली जात आहे.

एनसीपीओआर ही भारत सरकारच्या भू-विज्ञान मंत्रालयाची स्वायत्त संशोधन आणि विकास संस्था असून तिची स्थापना 25 मे 1998 ला झाली. अंटार्क्टिका येथील भारतीय संशोधन स्थानकाच्या देखरेखीच्या कामासह ही संस्था भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा समन्वय आणि अंमलबजावणी यांचे काम करते.

संबंधित बातम्या