निवडणूका संपल्या; आता देशात 15 दिवसासाठी राष्ट्रीय लॉकडाउन?

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देश आता लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. रविवारी, राष्ट्रीय टास्क फोर्सने दोन आठवड्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाउनची शिफारस केली आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देश आता लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. रविवारी, राष्ट्रीय टास्क फोर्सने दोन आठवड्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाउनची शिफारस केली आहे. या पथकात एम्स सोबतच इंडियन काउंसल ऑफ मेडिकल रिसर्चचा (ICMR)  ही समावेश आहे. त्याचबरोबर गोवा हरियाणा, ओडिशासह काही राज्यांनीही लॉकडाऊन जाहीर केले आहे.

गेल्या पाच आठवड्यांपासून, देशाला कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला आहे.  करोनाच्या वाढत्या संक्रमनाने बरीच राज्य ताब्यात घेतली आहे. भारतातील 12 राज्यांत, संसर्गाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 150 जिल्ह्यांमधील संसर्ग दर 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर 250 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान आहे. म्हणून या भागात कडक लॉकडाउन लावणे आवश्यक आहे.

केंद्र व राज्यसरकारांनी पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करावा; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला 

राष्ट्रीय स्तरावर लॉकडाउनची शिफारस

दोन आठवड्यांपूर्वी नॅशनल टास्क फोर्सने सरकारकडून संक्रमणग्रस्त जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीची शिफारस केली होती पण पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडूसह पाच राज्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशच्या पंचायत  निवडणुकांमुळे लॉकडाउनता विचार केला गेला नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता पुन्हा एकदा टास्क फोर्सने किमान दोन आठवड्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाउनची शिफारस केली आहे. नवी दिल्ली ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा समावेश आहे, ज्यांनी एक दिवस अगोदरच कडक लॉकडाउन लावण्याची शीफारस केली होती.  

काँग्रेसला मिळालेल्या अपयशानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

शेवटचा पर्याय म्हणून राज्यांत लॉकडाउन

20 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करतांना असे  स्पष्ट केले की सरकारची लॉकडाउन लावण्याची इच्छा नाही. सरकार लॉकडाउन लावण्याच्या बाजूने नाही. शेवटचा पर्याय म्हणून राज्यांना लॉकडाउन लावण्यात सांगितले होते. सध्या देशाला दवाई आणि कढाई दोन्ही ची गरज आहे.

नातवाला कोरोनापासून वाचवण्यासाठी वृद्ध दाम्पत्याने रेल्वेसमोर उडी घेतली 

या राज्यांनी केली लॉकडाउनची घोषणा
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना सांगितले की 3 मेपासून संपूर्ण राज्यात सात दिवस लॉकडाउन लागू केले जाईल. मागच्या वर्षीप्रमाणे या काळातही राज्य पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर ओडिशा सरकारने 5 ते 19 मे दरम्यान संपूर्ण लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही गोवा राज्यात 3 मे पासून ते 10 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. देशाची राजधानी दिल्लीत सध्या 10 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. लवकरच अन्य राज्यांमध्ये लॉकडाउन जाहीर केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या