National Vaccination Day 2021: मोठमोठ्या महामारीतून लसीने माणसाला वाचविलं

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस  म्हणून देशभरात साजरा केला जातो. 1995 मध्ये जेव्हा पोलिओ लसीकरण मोहीम करण्यात आली होती तेव्हा सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती.

16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. 1995 मध्ये जेव्हा पोलिओ लसीकरण मोहीम करण्यात आली होती तेव्हा सर्वप्रथम हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रत्येक राष्ट्रीय लसीकरण दिवसाला सुमारे 172 दशलक्ष मुलांना लसीकरण केले जाते. यावर्षी सुरु असलेल्या कोविड -19 च्या लसिकरणामुळे  या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये सध्या कोटी च्या घरात लसीकरणाची प्रक्रिया चालू आहे.

लसीकरण आता दुसऱ्या टप्प्यात सुरु झाले आहे. या लसीकरणात 60 वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस देण्याचे काम सुरु आहे. भारत कोरोना लसिकरणाच्या बाबतीत  अग्रगण्य देश बनत आहे. कारण भारत इतर देशालाही लस पुरवत आहे. आणि जागतिक पातळीवर 60% लसपुरवठा हा भारत देशाकडून होतो आहे. कोविड-19 चा सामना करण्यासाठीही भारताने लस बनवून त्याचा प्रबळ पुरवठा इतर देशांना करत आहे.

New Corona Guidelines: महाराष्ट्रात कोरोनाचे नवे निर्बंध लागू 

14 मार्च पर्यंत 2.99 कोटी लोकांना लस टोचण्यात आलेली आहे. तसेच टीबी, टिटॅनस आणि बरेच  जीवघेण्या आजारांवर लढा देण्यासाठी देशातील लस एक महत्त्वपूर्ण हत्यार ठरली आहे. आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. म्हणूनच या महत्वाच्या दिवशी सांगितले जाते कि, आजच्या जगात लसीकरणाचे मुख्य महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ नये. गोवर आणि विशेषत: कोविड-19 सारख्या प्राणघातक आरोग्याच्या परिस्थितीला पराभूत करण्यासाठी जगभरात अनेक लसीकरण मोहिमा ठिकठीकाणी कार्यरत आहेत.

COVID: लुधियानातील शिक्षक, पत्रकार, बँकर्स ला मिळणार कोविड लस 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लसीकरणातून अंदाजे 2 ते 3 दशलक्ष जीव वाचतात. आणि आता कोविड लस आल्याने  या लसिचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत पोहचवावा आणि त्यांना मदत करता यावी यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देशभरात लस मिळू लागली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 2.99 कोटींपेक्षा जास्त झाली आहे

संबंधित बातम्या