6 फेब्रुवारीला संयुक्त शेतकरी मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम

 Nationwide Chakka Jam from Samyukta Shetkari Morcha on 6th February
Nationwide Chakka Jam from Samyukta Shetkari Morcha on 6th February

दिल्ली: गेल्या  दोन  महिन्यांपासून  सुरु  असलेल्या  कृषी  कायद्याविरोधातील  आंदोलनाला  अधिक   तीव्र  करण्याचा  पवित्रा  संयुक्त  किसान  मोर्चाकडून  घेण्यात आला आहे. शेतकरी  संघटनांकडून  अणखी  एका  मोठ्य़ा  निर्णयाची  घोषणा  केली आहे.  येत्या 6  फेब्रुवारीला  शेतकरी  संघटनांकडून  देशव्यापी  चक्का  जाम  करण्याच  निर्णय  घेतला आहे. संयुक्त  किसान  मोर्चाचे   नेते   बलबीर  सिंह  यांनी  केली  आहे.  या   6 फेब्रुवारीच्या   दिवशी  12   ते  3  यावेळेत  सर्व  रस्ते  अडवण्यात  येणार  आहेत.  तसेच  आंदोलनाच्य़ा  आसपासच्या   ठिकाणी   सरकारने   इंटरनेट  सेवा  बंद  केली  आहे. केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला  सीतारामन यांनी  मांडलेल्या अर्थसंकल्पात  शेतकऱ्यांच्या  बाबतीत कोणत्याही  स्वरुपाची  तरतूद  करण्यात  आलेली  नसल्यामुळे  शेतकरी  नाराज  आहेत. याच  दरम्यान  गाझीपूर  सीमेवरील  सुरक्षेत  वाढ  करण्यात  आली  आहे.

प्रजासत्ताक  दिनी  शेतकरी  संघटनांकडून   दिल्लीत  काढण्यात  आलेल्या  शेतकरी  रॅलीला  हिंसंक  वळण  लागले. यावरुन  दिल्ली  पोलिसांकडून  शेतकरी  नेत्यांवर  गुन्हा दाखल  करण्यात  आले.  सध्या   टिकरी, गाझीपूर, सिंघू  बॉर्डरवर  दिल्ली  पोलिसांकडून कडक  बंदोबस्त  करण्यात  आला  आहे. केंद्रसरकार  आणि  शेतकरी  नेते  यांच्यात आतापर्यंत  चर्चेच्या  अनेक  फेऱ्या  पार  पडल्या  मात्र  कृषी  कायद्यासंबधी  तोडगा  निघू शकला  नाही. आंदोलन  सुरु  झाल्यापासून  अनेक  शेतकऱ्यांनी  आत्महत्या  केल्या  आहेत. ''आम्ही  चर्चेसाठी  सदैव  तयार  आहोत  40   शेतकरी  संघटनांनच्या  40  प्रतिनिधी  आहेत  त्यांच्याशी  केंद्रसरकारने  चर्चा  करावी''  असं  शेतकरी  नेते  राकेश टिकैत  यांनी  म्हटले  आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com