भारतात नैसर्गिक प्रकोपात सर्वाधिक बळी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

तीन दशकांत दररोज सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: भारतात दर वर्षी हजारो लोकांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे होत असतात. 

यात पूर, वीज कोसळणे, थंडी व उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आहे. अशा संकटांना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असेही म्हटले जाते. 

काही संकटे अशी असतात की ती नैसर्गिक असतात, पण त्यासाठी व्यवस्थाही दोषी असते. याचे ताजे उदाहरण म्हणजे यंदा आलेला पूर. या पुरामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. नैसर्गिक संकटामुळे तीन दशकात दररोज सुमारे ४५ लोकांचा मृत्यू झाला.

गेल्या ३० वर्षांत वीज कोसळून दररोज सहा जणांचा बळी गेल्याचे आढळले आहे.  राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी)  मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या मृत्युंसदर्भात अहवाल सादर केला आहे. यात तीन दशकांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले आहे. 

संबंधित बातम्या