नवज्योत सिद्धू विशेष आहारासाठी पुन्हा कोर्टात

तुरुंगातील अन्नामूळे यकृत समस्या, रक्त गोठणे आणि गव्हाची ऍलर्जीचा केला दावा
Navjot Sidhu
Navjot SidhuDainik Gomantak

नवज्योत सिद्धू याला 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर सिद्धूने पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला पटियाला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. यानंतर सिद्धूने तुरुंगातील काही घटक माझ्या प्रकृतीला अपायकारक ठरत असल्याचं म्हटले आहे. तुरुंगातील अन्नामूळे यकृत समस्या, रक्त गोठणे आणि गव्हाची ऍलर्जी असल्याने विशेष आहारासाठी पुन्हा कोर्टाचे दारवाजे ठोठावले आहेत. (Navjot Sidhu in court again for special diet)

Navjot Sidhu
कुतुबमिनार संकुलात होणार उत्खनन, आयकॉनोग्राफी करण्याच्या सूचना

सिद्धूने स्वतःला यकृताचा त्रास असल्याचे सांगितले आहे. याशिवाय रक्त गोठण्याची (ब्लड क्लॉटिंग) म्हणजेच जाड रक्ताची समस्या देखील असते. मलाही गव्हाची ऍलर्जी आहे. डॉक्टरांनी सांगितलेला विशेष आहारच त्यांना द्यावा, अशी मागणी सिद्धू यांनी केली. या संदर्भात पटियालाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने उत्तर मागितले आहे. यासाठी राजिंद्र रुग्णालयाच्या अधीक्षकांनी डॉक्टरांचे वैद्यकीय मंडळ तयार केले आहे. जो 23 मे रोजी विशेष आहाराबाबत न्यायालयात अहवाल सादर करणार आहे. उद्यापासून सिद्धूला विशेष आहार मिळण्याची शक्यता आहे.

Navjot Sidhu
'राहुल बाबा डोळे उघडा, इटालियन काढून भारतीय चष्मा घाला': शहांनी उडवली खिल्ली

सिद्धूला 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूने शुक्रवारी पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांची रवानगी पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. सिद्धूने तुरुंगातील मसूर आणि रोटी खाल्लेली नाही. सिद्धू फक्त सॅलड, फळे आणि चहा घेत आहेत. आजारपणामुळे तो इतर गोष्टी खाऊ शकत नसल्याचे तो सांगतो. त्यांना बिया नसलेली काही फळेच खावी लागतात.

...त्यामुळे सिद्धूला शुक्रवारीच शरणागती पत्करावी लागली

नवज्योत सिद्धू उद्या सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका दाखल करू शकतात. अटक टाळण्यासाठी सिद्धू यांनी यापूर्वी क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सिद्धूचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना योग्य प्रक्रियेनुसार याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सिद्धूला शुक्रवारीच शरणागती पत्करावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com