नवज्योत सिद्धूंनी दिली उपोषणाची धमकी...

केबल माफियांची मक्तेदारी संपुष्टात आणायचे आणि लोकांना (people) स्वस्त केबल कनेक्शन दयायचे.
नवज्योत सिद्धूंनी दिली उपोषणाची धमकी...
नवज्योत सिद्धूंDainik Gomantak

पंजाबमध्ये (Punjab) विधानसभा निवडणुकीआधीच (election) सर्व राजकीय पक्ष सक्रिय होत आहेत. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसही सत्तेवर आपली पकड राखण्यासाठी सक्रिय आहे. परंतु या निवडणुकीची कमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे आहे. सिद्धू हे राज्यातील आपल्याच सरकारवर (government) दबाव आणत असून, अंमली पदार्थांच्या धोक्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी उपोषणाची सुद्धा धमकी दिली.

रॅलीला संबोधित करताना नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावरच निशाणा साधला. तसेच ते म्हणले, राज्य सरकारने अंमली पदार्थ आणि अपवित्रीकरणाचा अहवाल सार्वजनिक केला नाही. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करणार असा इशारा दिला. याआधी सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही हल्लाबोल केला होता.

नवज्योत सिद्धूं
संसदेचे हिवाळी अधिवेशन: भाजपने खासदारांसाठी केला व्हीप जारी!

सिद्धू यांचा हल्लाबोल:

दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी विद्यमान मुख्यमंत्री (CM) चन्नी यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी सीएम चन्नी यांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले, CM चरणजीत सिंग चन्नी यांनी केबल टीव्हीचे शुल्क दरमहा 100 रुपये करण्याची घोषणा व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हती, कारण ट्रायने 130 रुपये दर निश्चित केला.

तसेच, नवज्योतसिंग सिद्धू पुढे म्हणाले, केबल माफियांची मक्तेदारी संपुष्टात आणायचे आणि लोकांना स्वस्त केबल कनेक्शन दयायचे. 2017 मध्ये मी पंजाब मनोरंजन कर विधेयक मंत्रिमंडळात आणले. तसेच त्यांचे पंजाब मॉडेल (Punjab model) हे धोरण होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com