"वैचारिक मतभेद, पण...": तजिंदर बग्गासाठी नवज्योत सिंग सिद्धू उतरले मैदानात

भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिल्ली युनिटचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या अटकेवर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केले आहे.
"वैचारिक मतभेद, पण...": तजिंदर बग्गासाठी  नवज्योत सिंग सिद्धू उतरले मैदानात
Navjot Singh Sidhu Dainik Gomantak

भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिल्ली युनिटचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या अटकेवर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केले आहे. सिध्दूंनी या अटकेला विरोध केला. सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर निशाणा साधत बग्गा यांची अटक हा वैयक्तिक शत्रुत्वाचा सूड आहे, आणि हे लोक पंजाब पोलिसांची प्रतिमा खराब करत आहेत. (Navjot Singh Sidhu has opposed the arrest of BJP's Tejinder Pal Singh Bagga)

नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, ''तजिंदर बग्गा वेगळ्या पक्षाचा असू शकतो, विचारधारेमध्ये मतभेद असू शकतात. पण अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा राजकीय सूड उगवून पंजाब पोलिसांच्या माध्यमातून वैयक्तिक खाते मिटवणे हे एक मोठं पाप आहे... पंजाब पोलिसांची प्रतिमा मलिन करणं बंद करा.''

Navjot Singh Sidhu
कुरुक्षेत्रात 'महाभारत', तजिंदर बग्गाला हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या दिले ताब्यात

खरं तर बग्गा सोशल मीडियावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार आवाज उठवत आहेत. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी केजरीवाल यांच्याविरोधात ट्विट करुन बग्गा यांनी काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला होता.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी गेल्या महिन्यात बग्गा विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करणे, शत्रुत्व वाढवणे आणि धमकी देणे यासाठी गुन्हा दाखल केला होता. मोहालीतील आप नेते सनी अहलुवालिया यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बग्गाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता.

Navjot Singh Sidhu
''ड्रग ओव्हरडोस'', आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू; 'आप' सरकारवर विरोधकांचा घणाघात

तसेच, 1 एप्रिल रोजी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, बग्गा यांनी 30 मार्च रोजी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या निषेधात भाग घेतला होता. यात त्याने कथितपणे आक्षेपार्ह टिप्पणी केली असल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले.

दुसरीकडे, बग्गा यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर हुकूमशाही मानसिकता असल्याचा आणि पंजाबच्या पोलिस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

भाजपच्या पंजाब (Punjab) युनिटचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, "केजरीवाल ज्या प्रकारे पंजाब पोलिसांचा गैरवापर करत आहेत ते निषेधार्ह आहे. पंजाब पोलिसांनी तेजिंदर पाल सिंग बग्गा याला त्याच्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी बग्गा आणि त्याच्या वडिलांना अमानुष वागणूक दिली. परंतु, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) लक्षात ठेवा, तुमच्या अशा दडपशाहीने खऱ्या शीखांना घाबरवता येणार नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.