PM Modi च्यां दौऱ्यातील सुरक्षा भंग म्हणजे केवळ 'ड्रामेबाजी'

पंजाबमधील हुसैनीवालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा दिसून आला.
PM Modi च्यां दौऱ्यातील सुरक्षा भंग म्हणजे केवळ 'ड्रामेबाजी'

Navjot Singh Sidhu

Dainik Gomantak 

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये पंजाब राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूीवर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वच राजकीय पक्षांनी पंजाबमध्ये (Punjab) प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेस सरकारला शह देण्यासाठी इतर राजकीय पक्षांनी चांगलीच मोट बांधली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल पंजाब (Punjab) दौऱ्यावर होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना हा दौरा रद्द करावा लागला.

दरम्यान, पंजाबमधील हुसैनीवालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा दिसून आला. दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी या प्रकरणावरुन या घटनेला ड्रामा म्हटलं आहे.

<div class="paragraphs"><p>Navjot Singh Sidhu</p></div>
'पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला' : स्मृती इराणी

रिकाम्या खुर्च्यांमुळे रॅली रद्द : सिद्धू

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचे वर्णन ड्रामा असं केलं आहे. रिकाम्या खुर्च्यांमुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे सिद्धू यांनी म्हटले.

एडीजीपींच्या पत्रातून मोठा खुलासा

पंजाबच्या एडीजीपी यांच्या पत्रानुसार पंजाब सरकारला शेतकऱ्यांच्या मोर्चाची आधीच कल्पना होती. एडीजीपींनी पत्रात 5 तारखेला पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांचे उपोषण आहे, त्यामुळे विशेष सुरक्षा व्यवस्था करावी, असेही लिहिले होते.

पंजाब सरकारच्या दाव्यांची पोल खोल

म्हणजेच पंजाबच्या एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दावा केला होता की, आम्हाला पीएम मोदी रस्त्याने फिरोजपूरला जात असल्याची कोणतीही माहिती नव्हती. पीएम मोदींच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारचा हालगर्जीरपणा झाला नसल्याचेही मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Navjot Singh Sidhu</p></div>
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे 'लाल सलाम' पुस्तक लवकरच होणार प्रकाशित

राष्ट्रपती कोविंद यांनी चिंता व्यक्त केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींची (President Ramnath Kovind) भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com