
Bihar Crime: बिहारमधील नवादा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन एका महिलेवर बलात्कार केला.
यादरम्यान त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तिच्याकडे 2 लाखांची मागणी केली. महिला डॉक्टरला व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती करत राहिली, परंतु त्याने व्हिडिओ डिलीट केला नाही आणि पैसे न दिल्याने पुन्हा पुन्हा तिच्यासोबत घाणेरडे कृत्य सुरुच ठेवले.
दरम्यान, महिलेने याबाबत पतीला सांगितले, परंतु त्याच्याकडून तिला साथ मिळाली नाही. डॉक्टर विरोधात तक्रार दाखल करण्याऐवजी तो गाव सोडून निघून गेला. हे प्रकरण नवादा जिल्ह्यातील कौकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
याचदरम्यान, पतीची साथ न मिळाल्यानंतर पीडितेने हिम्मत करुन नवादा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. लेखी तक्रारीत महिलेने पोलिसांना सांगितले की, ती चार मुलांची आई आहे.
तब्येत बिघडल्याने ती गावातील डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती. मात्र, डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली भूल देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
यानंतर डॉक्टरने (Doctor) तिच्याकडे दोन लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्याने वारंवार बलात्कार केला. मात्र महिलेने विरोध केला असता त्याने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर मोहम्मद जलाल गाव सोडून पळून गेला.
याप्रकरणी नवादा पोलिस ठाण्याच्या प्रमुख अंशू प्रिया यांनी सांगितले की, आरोपी डॉक्टर मोहम्मद जलाल याने उपचाराच्या नावाखाली पीडितेवर बलात्कार केला.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून कलम 164 अंतर्गत महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यासोबतच महिलेचे मेडिकलही करण्यात आले. आरोपी डॉक्टरच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.