शरद पवार यांनी राहूल गांधींबाबत केले खोचक वक्तव्य; म्हणाले...

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

राहूल गांधींना नेता मानण्यास देश तयार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. मात्र, राहूल यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरावर त्यांनी खेदही व्यक्त केला आहे.

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहूल गांधींसंदर्भात मोठे विधान केले आहे. राहूल यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना राहूल गांधींना नेता मानण्यास देश तयार आहे का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. मात्र, राहूल यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरावर त्यांनी खेदही व्यक्त केला आहे.

 दरम्यान, विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, या संदर्भात काही प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्याचा अभाव वाटतो. ओबामा यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका करताना ते आपल्या गुरूला प्रभावित करणाऱ्या उत्सुक विद्यार्थ्यासारखे असून त्यांच्यात योग्यता मात्र नाही, अशी टिप्पणी केली होती. यावर पवार यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर सर्वांचे विचार स्वीकार करावेतच याची काही गरज नसल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले,'मी माझ्या देशाच्या नेतृत्वाबाबत काहीही म्हणू शकतो. मात्र, दुसऱ्या देशाच्या नेतृत्वाबाबत मी बोलणार नाही. कोणाला तरी त्या सीमा पाळाव्याच लागतात. कारण ओबामांनी त्या सीमा पार करून टाकल्या आहेत.

काँग्रेसचे भविष्य आणि राहूल गांधी हे पक्षासाठी खरंच बाधा ठरत आहेत का असा प्रश्न विचारल्यावर कोणत्याही पक्षाचे नेतृत्व आपल्याला आघाडीमध्ये  कसे स्वीकारले जाते यावर निर्भर असते.   

संबंधित बातम्या