चव्हाण, लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर, पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार आज करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर, पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार आज करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नावांची घोषणा केली. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कधी उमेदवार जाहीर करणार याची उत्सुकता होती. राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या