‘एनसीआरबी’ची धक्कादायक आकडेवारी: शेतकरी, कामगारांच्या आत्महत्या वाढल्या

पीटीआय
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

गेल्या वर्षभरात शेतीक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या ४३ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) च्या अहवालातून पुढे आली.

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरात शेतीक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या ४३ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) च्या अहवालातून पुढे आली. साधारणपणे वर्षभराच्या काळामध्ये ३२ हजार ५६३ रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या. आतापर्यंतच्या एकूण आत्महत्यांमध्ये हे प्रमाण २३.४ टक्के आहे. २०१८ मध्ये ३० हजार १३२ जणांनी आत्महत्या केल्या.

शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांमागील संकटांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. मागील वर्षभरामध्ये १०,२८१ लोकांनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये ५ हजार ९५७ शेतकरी आणि उत्पादक तसेच ४ हजार ३२ शेतमजुरांचा देखील समावेश आहे.

राज्यनिहाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या (प्रमाण टक्क्यांमध्ये)
महाराष्ट्र:    ३८.२
कर्नाटक:    १९.४
आंध्रप्रदेश:    १०
मध्यप्रदेश:    ५.३
छत्तीसगड/तेलंगण:     ४.९

देशातील एकूण शेतकरी आत्महत्या
१ लाख ३९ हजार १२३:   २०१९
१ लाख ३४ हजार ५१६:   २०१८
 

संबंधित बातम्या