नेताजी सुभाषचंद्र बोस: 'यश हे नेहमीच अपयशाच्या स्तंभावर उभे असते'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

महान स्वतंत्रता सेनानी आणि भारत मातेचे  सुपुत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली, आणि हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषीत केला. 

नेताजी सुभाषचंद् बोस: जेव्हा जेव्हा ब्रिटीशांविरूद्धच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आठवला जाईल तेव्हा प्रत्येकाच्या जिभेवर एक नाव नक्कीच असेल, ते म्हणजे "नेताजी सुभाषचंद्र बोस;" ‘तूम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा' अशी घोषणाबाजी करणारे सुभाषचंद्र बोस. ज्यांनी देशवासीयांना सांगितले की, 'हे लक्षात असू द्या की सर्वात मोठा गुन्हा म्हणजे अन्याय सहन करणे आणि चुकीच्या गोष्टीशी तडजोड करणे.' ज्यांनी असे सांगितले की, 'यश हे नेहमीच अपयशाच्या स्तंभावर उभे असते.' नेताजींचे शब्द, त्याचे संघर्ष आणि त्यांचे जीवन या तिन्ही गोष्टीं आजही प्रेरणा देतात.

महान स्वतंत्रता सेनानी आणि भारत मातेचे  सुपुत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमीत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली, आणि हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषीत केला.  "देशाला नेताजींच्या गोष्टी आणि समर्पण नेहमीच स्मरणात राहणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि आदर्श आपल्याला भारत निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरणा देत राहतील… ते एक बलवान, आत्मविश्वास व आत्मनिर्भर भारतीय होते. ज्याचा मानव-केंद्रित दृष्टिकोन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे." असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हताश झालेल्या इतर स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे, बोस यांना सरकारी नोकरी करायची नव्हती आणि म्हणूनच त्यांनी सरकारी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला परंतु देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन वेगळं काम करण्याचा निर्णय घेतला. सुभाषचंद्र बोस यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सर्व देशवासीयांना चकित केले होते.

जेव्हा बोस आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात परत आले तेव्हा त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी कोणत्या मार्गाने चालले पाहिजे याविषयी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात मतभेद होते परंतु दोघांनाही एकमेकांचा आदर होता.

सुभाषचंद्र बोस यांनी भारताबाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बर्‍याच गोष्टी केल्या. यात त्यांची आझाद हिंद फौजची भूमिका सर्वात महत्वाची आहे. सुभाषचंद्र बोस म्हणायचे की जीवनात संघर्ष असल्यची भीती बाळगू नका, आयुष्याची निम्मी चव नाहीशी होईल. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी प्रत्येक अडथळा पार करून मोलाची भूमिका बजावली असली तरी नेताजींच्या जीवनात अनेक संघर्ष होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या