नेटफ्लिक्स दोन दिवसांसाठी मिळणार मोफत..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

भारतातील लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप नेटफ्लिक्सने भारतात आपली सेवा दोन दिवसांसाठी मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ असा, की कार्ड डिटेल्स न देताही ग्राहक आपल्या आवडीचा शो किंवा चित्रपट पाहू शकतात.

मुंबई :  भारतातील लोकप्रिय स्ट्रीमिंग अ‍ॅप नेटफ्लिक्सने भारतात आपली सेवा दोन दिवसांसाठी मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ असा, की कार्ड डिटेल्स न देताही ग्राहक आपल्या आवडीचा शो किंवा चित्रपट पाहू शकतात. नेटफ्लिक्स स्ट्रिम फेस्ट अंतर्गत युझर्सना ही मोफत सेवा दिली जाणार आहे. 5 आणि 6 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेलं 'नेटफ्लिक्स स्ट्रिम फेस्ट'  5 डिसेंबरला रात्री 12.01 वाजल्यापासून ते 6 डिसेंबरला रात्री 11.59 पर्यंत सुरू असेल.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपले नाव, ईमेल हा माहिती भरावी लागेल. मोफत स्ट्रिमिंगसह नेटफ्लिक्सच्या इतरही ऑफर्स आहेत, ज्यामध्ये प्रोफाईल, पॅरेंटल कंट्रोल, क्रिएट लिस्ट, डाऊनलोड मुव्ही आणि शो या फिचर्सचा समावेश आहे. या स्ट्रिमफेस्टमुळे नेटफ्लिक्सच्या युझर्समध्ये मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. तसेच दोन दिवसांसाठी मोफत सब्सक्रिप्शन घेणारे अनेक ग्राहक पुढे नेटफ्लिक्सचे प्लॅन्स विकत घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा : 

पंतप्रधान मोदींचे पुन्हा जय जवान
 

संबंधित बातम्या