राजस्थानातही  नवे कृषी कायदे

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राजस्थान विधानसभेत आज वेगळ्या तीन कायद्यांचा मसुदा सादर करण्यात आला.

जयपूर :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राजस्थान विधानसभेत आज वेगळ्या तीन कायद्यांचा मसुदा सादर करण्यात आला. या आधी पंजाब विधिमंडळाने देखील अशाच पद्धतीचे कायदे संमत केले होते. राजस्थानचे विधिमंडळ कामकाजमंत्री शांती धारिवाल यांनी या संदर्भातील मसुदा सादर केला. आज ही विधेयके सादर करण्यात आल्यानंतर दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अन्य नेत्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

संबंधित बातम्या