Corona Update : सावधान! देशात पुन्हा वाढतोय कोरोनाचा विळखा

Corona
Corona

चीनमधून सर्व जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने मागील वर्षात देशात देखील चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात हैदोस घालण्यास सुरवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेली कोरोनाची आकडेवारी वाढतच चालली आहे. मागील चोवीस तासात देशात 62 हजार 714 कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 312 जणांचा जीव कोरोनामुळे गेला असल्याची माहिती मिळाली आहे. (New cases of corona are on the rise in the country)

कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 झाली आहे. याशिवाय नवीन वर्षात एकाच दिवसात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या मागील चोवीस तासात सर्वाधिक राहिली आहे. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतातील 28 हजार 739 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 86 हजार 310 वर पोहचली आहे. त्याचवेळेस देशात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 552 जणांना कोरोनाच्या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी 12 राज्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्यांतील 46 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा (Corona) सर्वाधिक प्रभाव दिसून येत असल्याचे आरोग्य सचिवांनी सांगितले. याशिवाय, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पाच सूत्रीय धोरणावर अंमलबजावणी करण्याचे सचिवांनी म्हटले. केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, बंगाल, कर्नाटक, बिहार, पंजाब आणि दिल्लीसह 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक प्रभावी पावले उचलण्यास सांगितले. यावेळी महाराष्ट्रात  25 जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात 59.8 टक्के प्रकरणे नोंदली गेली असल्याचे आरोग्य सचिवांनी सांगितले.        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com