1 एप्रिल पासून चारचाकी वाहनांसाठी केंद्र सरकारचा नवीन नियम; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

1 एप्रिलपासून सर्व प्रवासी गाड्यांमधील सुरक्षेचे मानदंड बदलणार आहे. नव्या नियमांमध्ये चार चाकी वाहनांच्या एअरबॅग संबंधित एक महत्वाच्या निर्णयाचा यामध्ये समावेश आहे.

सध्या केंद्र सरकारचे रस्ते आणि सुरक्षा विभाग लोकांच्या सुरक्षेकडे सातत्याने लक्ष देत असल्याचे दिसते आहे. वाहनांसंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणी सुद्धा केंद्र सरकार कडून होताना दिसते आहे. याच दिशेने पाऊले उचलत केंद्र सरकार 1 एप्रिलपासून सर्व प्रवासी गाड्यांमधील सुरक्षेचे मानदंड बदलणार आहे. नव्या नियमांमध्ये चार चाकी वाहनांच्या एअरबॅग संबंधित एक महत्वाच्या निर्णयाचा यामध्ये समावेश आहे.(New Central Government Rules for Four Wheelers)

भारतात विक्रीसाठी केल्या जात असलेल्या सर्व प्रवासी गाड्यांमध्ये एअर बॅग देखील ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर देखील बंधनकारक केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च 2021 च्या पहिल्या आठवड्यात एअरबॅगच्या अनिवार्यतेबद्दलच्या तरतूदीसाठी अधिसूचना जारी केली होती.सध्या मारुती सुझुकी अल्टो, एस-प्रेसो, वॅगन-आर, ह्युंदाई सॅन्ट्रो, डॅटसन रेडी-जीओ, आणि महिंद्रा बोलेरो सारख्या आणि इतर बर्‍याच कारकडे समोरील दोन्हीही सीटला एअरबॅग आहे. एअरबॅगच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एन्ट्री-लेव्हल कारची किंमत 10,000 ते  15,000 पर्यंत वाढणार आहे. किंमत वाढीचे हे परिणाम बहुतेक बेस आणि मिड-स्पेक प्रकारांमध्ये दिसून येईल, कारण बर्‍याच टॉप व्हेरिएंटमध्ये एअरबॅग्ज आधीच अस्तित्वात आहेत.  महत्वाची बाब म्हणजे, शासनाची ही अधिसूचना केवळ वाहन उत्पादकांसाठीच असून, वाहनाच्या मालकांसाठी नाही. केवळ निर्मात्यांसाठी हे नियम लागू असणार आहेत.  

ट्विट मधल्या एका चुकीमुळे प्रियांका गांधी होत आहेत ट्रोल

दरम्यान एकरबॅग  (Airbag) ही एक स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा आहे. जेव्हा कारची अचानक टक्कर होते तेव्हा त्वरीत या एअरबॅग उघडतात. जेणेकरून अपघात झाल्यास ड्रायव्हर आणि प्रवाशाला थेट इजा होत नाही. सध्या केंद्र सरकारने सर्व वाहनांसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग अर्थात समोरील दोन्हीही सीट साठी  अनिवार्य केले आहेत. नवीन धोरणानुसार 1 एप्रिल 2021 नंतर विकल्या गेलेल्या सर्व कार ड्युअल फ्रंट बॅगसह येणार आहेत. त्याचबरोबर, ज्या वाहनांची विक्री झालेली आहे, त्यांना एअरबॅग बसविण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत (August) मुदत दिली जाईल.

संबंधित बातम्या