नीता अंबानींच्या मानद प्राद्यापक नियुक्तीवरुन नवा वाद

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

बनारस विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विद्याशाखेनं नीता अबांनी यांना मानद प्राध्यापक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं वृत्त समोर आलं होतं.

बनारस: प्रसिध्द उद्योगपती मुकेश अबांनी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना बनारस विद्यापीठाच्या मानद प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्याच्या वृत्ताची चर्चा सुरु असताना मंगळवारी बनारस विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी कुलगुरु राकेश भटनागर यांना निवेदन दिले आहे. दरम्यान रिलायन्स समुहाकडून खुलासा करण्यात आला आहे.

बनारस विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विद्याशाखेनं नीता अबांनी यांना मानद प्राध्यापक म्हणून काम करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं वृत्त समोर आलं होतं. नीता अंबानी यांनी विद्यापीठामधील महिला अभ्यास केंद्रामध्ये मानद प्राध्यापक म्हणून सहभागी व्हावे अशी विनंती पत्रात केल्याचंही वृत्तामध्ये म्हटलेलं होतं. या वृत्तानंतर विद्यापीठीतील विद्यर्थ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

पंतप्रधानांचे मुख्य़ सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा

नीता अंबानी मानद प्राध्यापक होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच रिलायन्स उद्योग समूहाकडून खुलासा करण्यात आला आहे. ‘’नीता अंबानी बनारस हिंदू विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक होणार असल्याचे वृत्त पूर्णत:हा खोटं आहे. त्यांना कोणत्य़ाही स्वरुपाचा प्रस्ताव विद्यापीठाकडून देण्यात आलेला नाही,’’ असं रिलायन्स उद्योग समूहाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

बनारस विद्यापीठामधील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानद प्राध्यापक पदासाठी दोन जागापैंकी एका जागेवर उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी प्रिती अदानी यांना नियुक्त करणार असल्याचं म्हटलं होतं. महिला अभ्यास केंद्रातील मानद प्राध्यापक पदासाठी तीन नियुक्त्या बाकी असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.

‘’महिला सशक्तीकरणासंदर्भात आम्ही संशोधन करत आहोत. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आमच्याकडे उपलब्ध आहे. बनारस विद्यापीठाच्या परंपरेनुसार समाजसेवा करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा मानद प्राध्यापक म्हणून समावेश करण्यात यावा यासाठी रिलायन्स फाऊण्डेशनच्या नीता अंबानी यांना विचारण्यात आलं होतं. त्यांच्या अनुभवांचा आमच्या महिला अभ्यास केंद्राला फायदा व्हावा या हेतूने त्यांना विचारणा करण्यात आली होती,’’ अशी माहिती सामाजिक शास्त्र विभागप्रमुख कौशल किशोर यांनी म्हटलं आहे. 
 

संबंधित बातम्या