आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचना: योगासन करा, च्यवनप्राश घ्या

पीटीआय
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने काही टिप्स दिल्या आहेत. योगासनापासून ते काढा घेण्यापर्यंतच्या सूचनांचा यात समावेश आहे. 

नवी दिल्ली: कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाने काही टिप्स दिल्या आहेत. योगासनापासून ते काढा घेण्यापर्यंतच्या सूचनांचा यात समावेश आहे. 

याशिवाय नियमित प्राणायाम, च्यवनप्राशचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. मास्कचा वापर, गर्दीत जाणे टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

देशात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७ लाखांचवर गेला आहे. अर्थात बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे. 

या मार्गदर्शक सूचनांत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कोणती पथ्य पाळावीत तसेच काय करावे आणि काय करु नये, याचा समावेश केला आहे. आरोग्य मंत्रालयाने नारिकांना पुरेशा प्रमाणात गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांचे सेवन करण्याचाही सल्ला दिला आहे. घरातील तापमान, रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी साखरेची पातळी तपासावी, अशीही सूचना दिली आहे. याशिवाय डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पल्स ऑक्सिमेट्रीचा वापर करणे गरजेचे आहे. तत्पूर्वी आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयाला देखील सूचना केल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करु नये, असे सांगितले आहे. 

संबंधित बातम्या