कोरोना लसीची नवीन किंमत; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

सीरम संस्थेने बुधवारी कोविशील्ड लसीचे नवीन दर निश्चित केले आहेत.

सीरम संस्थेने बुधवारी कोविशील्ड लसीचे नवीन दर निश्चित केले आहेत. कोरीविल्डची लस खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना दिली जाईल, असे सीरमने सांगितले. यापूर्वी  रुग्णालयांना ही लस 250 रुपयांना दिली जात होती. राज्य सरकारसाठी लसीचे दर 400 रुपये असतील आणि केंद्राला पूर्वीप्रमाणे 150 रुपयांवर लस मिळणार आहे. पुढील दोन महिन्यांत लसीचे उत्पादन वाढविण्यात येईल, असे सीरमने सांगितले. सध्या तयार केलेल्या लस उत्पादनांपैकी 50 टक्के लस केंद्राच्या लसीकरण कार्यक्रमास पाठविली जाते. उर्वरित 50 टक्के लस राज्य आणि खासगी रुग्णालयात पाठविली जाते. (New price of corona vaccine)

'अखेर काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा होणार''

लस 70 टक्के प्रभावी
जर कोविशील्डचा हाफ डोस देण्यात आला तर  90 टक्के प्रभावी आहे. एका महिन्यानंतर पूर्ण डोस दिल्यांनतर  62 टक्के प्रभावी आहे. दोन्ही प्रकारच्या डोसमध्ये सरासरी 70 टक्के प्रभावी आहे. ब्रिटीश नियामक ही लस 80 टक्के पर्यंत प्रभावी मानतात.

अनेक देशात लसीचा वापर होतोय
कोविशील्ड लस  सर्वात पहिले यूके मेडिसिन्स आणि हेल्थकेयर प्रोडक्ट्स रेगुलेटरी एजन्सीने (एमएचआरए) 29 डिसेंबर रोजी आपत्कालीन वापरण्यासाठी मंजुरी दिली.  त्यानंतर भारत, ब्राझील, अर्जेन्टिना, डोमिनिकन रिपब्लिक, अल सल्वाडोर, मेक्सिको, मोरक्को, युरोपीयन मेडिसिन्स एजन्सी (ईएमए) यांनी सुद्धा लसीला मंजुरी दिली आहे. 

1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना लस 
तत्पूर्वी, केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी उशिरा निर्णय घेऊन 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयातील लोकांना 1 मेपासून म्हणजे कामगार दिनापासून लस दिली जाईल. सध्या देशातील 45  किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचे डोस दिले जात आहेत. तिसऱ्या टप्यात संपूर्ण देशातील 18 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.  

रेमडिसीवीर  कोरोनासाठी गुणकारी असल्याच्या कोणताही पुरावा नाही : जागतिक आरोग्य...

21 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत देशात 13.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 11.16 कोटी हे पहिले डोस आहेत, तर 1.84  कोटी दुसरे डोस आहेत. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, आरोग्यसेवा, अग्रभागी कामगार आणि देशातील एकूण 45+ लोकसंख्येला लस देण्यासाठी अजूनही सुमारे 45 कोटी लस डोस आवश्यक आहेत.

संबंधित बातम्या