केंद्र सरकारकडून म्युकरमायकोसिसचा साथीच्या आजारात समावेश, याबाबतची नवी नियमावली लागू 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

म्युकरमायकोसिसचा साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत करावा. यात असणाऱ्या सूचनांचे आणि नियमांचे पालन सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये (medical college) यांनी करणे बंधन कारक असेल.

नवी दिल्ली : भारतात म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत आसल्याचे केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आले आहे. कोरोनासोबत म्युकरमायकोसिसचा देखील धोका वाढताना दिसत आहे. देशातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याने सरकारने या आजाराचा साथीच्या रोगात समावेश केला असल्याची माहिती आरोग्य विभागाचे (Health Department) सहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी दिली.(New regulations on the inclusion of mucormycosis in communicable diseases by the Central Government)

 

या आजाराला राजस्थान, तेलंगणा याला काळी बुरशी आजाराची महामारी म्हणून याआधिच घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने देखील आता याची गंभीर दखल घेत याचा साथीच्या रोगाच्या कायद्यामध्ये  समावेश केला आहे. याची अधिकृत घोषणा केंद्र सरकार कडून करण्यात आली आहे. देशातील सर्व सरकारी-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना म्युकरमायकोसिसबाबत साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये नमूद  केलेल्या नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच केंद्राने सर्व राज्य सरकारांना  म्युकरमायकोसिसचा साथीचा आजार म्हणून जाहीर करण्याचे अवाहन केले आहे. 

कोरोना रोखण्यात भाजप सरकार फेल; 'आप'ची हेल्पलाइन सुरु

याबाबत बोलताना आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अगरवाल म्हणाले, सर्वांना विनंती आहे की, म्युकरमायकोसिसचा साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत करावा. यात असणाऱ्या सूचनांचे आणि नियमांचे पालन सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये (Medical College) यांनी करणे बंधन कारक असेल. संशयीत आणि बाधित रुग्णांची आकडेवारी जिल्हानिहाय आरोग्यविभागाला कळविणे गरजेचे असून जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा यात समावेश असेल. असे अगरवाल यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या