मद्यप्राशन करण्यासंदर्भात दिल्ली सरकारने जारी केली नवी नियमावली 

मद्यप्राशन करण्यासंदर्भात दिल्ली सरकारने जारी केली नवी नियमावली 
Manish Sisodia.jpg

दिल्ली: दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण जाहीर केले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय राजधानीत मद्यप्राशन करण्याचे कायदेशीर वय 25 वरून 21 करण्यात आले आहे. याशिवाय, आम आदमी पक्षाच्या दिल्लीत आता दारूचे कोणतेही नवीन दुकान उघडणार नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज याबाबतच्या घोषणा केल्या आहेत.(New rules issued by the Delhi government regarding alcohol consumption)

दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या या नवीन धोरणात मद्यप्राशन करण्याच्या वयोमर्यादेत मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्लीत मद्यप्राशन करण्यासाठी किमान वय २५ वर्ष असणे आवश्यक होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून, ते 21 वर्षे करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीतील सरकारी दारुची दुकाने आता बंद होणार असून, निविदाद्वारे खासगी लोकांना मद्य दुकानांचे परवाने देण्यात येणार आहेत. नव्या नियमांनुसार दारूच्या दुकानात 500 चौरस मीटर जागा असणे बंधनकारक असेल. तसेच नव्या धोरणामुळे सरकारच्या अपेक्षेनुसार सरकारला मिळणाऱ्या वार्षिक महसुलात २ हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे. दिल्लीत (Delhi) सध्या 850 दारूची दुकाने आहेत. तर आता नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत. त्याऐवजी जुन्या दुकानांचीच वितरण व्यवस्था दुरुस्त केली जाईल.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) म्हणाले की,"नव्या धोरणानुसार दिल्लीत दारूचे समान वितरण होईल, परंतु कोणतीही नवीन दुकाने उघडली जाणार नाहीत. तसेच एकही सरकारी दारूचे दुकान राहणार नाही. आणि दारूची गुणवत्ता तपासण्यासाठी सरकार गुणवत्ता तपासणीसाठी स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रणाली तयार करणार आहे.''.(New rules issued by the Delhi government regarding alcohol consumption)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com