प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता भारतीय रेल्वेने बनवले नवे नियम
New rules made by Indian Railways for the safety of passengers Laptops or any electric device cannot be charged in railway

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता भारतीय रेल्वेने बनवले नवे नियम

नवी दिल्ली: प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान मोबाईल, लॅपटॉप किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक डिव्हाइस चार्ज करता येणार नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. असा नियमही बनविण्यात आला आहे की जर एखादा प्रवासी सिगारेट ओढताना पकडला गेला तर त्याला 100 रुपये दंड आकारला जाईल. . पश्चिम रेल्वेने या निर्णयाची अंमलबजावणी 16 मार्चपासूनच सुरु केली आहे. तशी सूचना रेल्वे मंडळाने सर्व विभागांना दिली आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता रेल्वेने नवीन नियम बनवले आहेत 

प्रवाशांना रात्री रेल्वेच्या डब्यात चार्जिंग पॉईंट वापरता येणार नाही. सकाळी 11 ते पहाटे 5 या वेळेत गाड्यांमध्ये चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री लॅपटॉप आणि मोबाईल फोन चार्ज केल्याने जास्त गरम होण्याचा धोका आहे. कारण बरेच लोकं मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जींग ला लावून झोपी जातात. यामुळे आग लागण्याचा धोका असतो.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही समस्या सामान्य आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे आग लागण्याचा धोका आहे. रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार सर्व झोनमध्ये याची अंमलबजावणी केली जात आहे. गाड्यांमध्ये वारंवार आगीच्या घटना घडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसला लागलेल्या आगीच्या घटनेचा विचार करता हा नियम कडक करण्यात आला आहे. कारण एका डब्यात लागलेली आग सात डब्यांमध्ये पसरली. त्याचप्रमाणे रेल्वेने सिगारेट ओढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com