'न्यू ईयर'च्या कार्यक्रमांवर बंगळूरमध्ये बंदी; रस्त्यांवरही गर्दी नको

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व पब, रेस्टॉरंटमध्ये नववर्ष साजरे करण्यावर कोरोनामुळे बंदी असेल.

बंगळूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व पब, रेस्टॉरंटमध्ये नववर्ष साजरे करण्यावर कोरोनामुळे बंदी असेल. त्याचप्रमाणे, रस्त्यांवरही नववर्षाचे स्वागत करता येणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. बंगळूरमधील एमजी रोड, चर्च स्ट्रीट, ब्रिगेड रस्ता आदी ठिकाणी दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमते. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ.के. सुधाकर यांनीही नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान पब, रेस्टॉरंटस या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. 

 

अधिक वाचा :

अमित शहांची ‘विश्‍वभारती’ला भेट देऊन रवींद्रनाथ टागोरांना आदरांजली

पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतं दिली, तर रक्ताचे पाट वाहतील

ममता बॅनर्जींचं सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर

संबंधित बातम्या