विजापुर : विजापुर-सोलापूर (एनएच- 52) दरम्यान करण्यात येणाऱ्या 25.54 किमी लांबीच्या चौपदरीकरणाची एक लेन केवळ 18 तासांमध्ये पूर्ण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एक दुर्मिळ कामगिरी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर "या कामगिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. कामगार आणि एनएचएआयचे प्रकल्प संचालक, इतर अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी यांचे मी अभिनंदन करतो," असे म्हणत या कामगिरीचे कौतुक केले.
राहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा?
हा रस्ता बंगळुरू-चित्रदुर्ग-विजापुर-सोलापूर-औरंगाबाद-धुळे-लिंगोर-ग्वालियर या उच्च घनता ट्रॅफिक कॉरिडोरचा एक भाग आहे. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार कंत्राटदार कंपनीच्या सुमारे 500 कर्मचार्यांनी यासाठी परिश्रम घेतले. एकूण 25.54 किमी रस्ता डांबरीकरणाचे काम 18 तासांत केले गेले आहे. एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले, सुरुवातीला फक्त 12 तासात फक्त 20 किमी अंतरावरील सिंगल लेनसाठी ब्लॅकटॉपचे काम करण्याचे नियोजन होते परंतु नंतर त्याच मार्गावर आणखी 5.5 किमी अंतर वाढवण्यात आल्याने अजून सहा तास लागले.
सोलापूर ते विजयपूर महामार्गाला आधी महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखले जात होते. बायपास फोर लेन रस्ता सोलापूर ते विजयपूर दरम्यान तयार करण्यात येणार आहे. या मार्गावर सहा उड्डाणपूलही असतील. "सध्या, सोलापूर-विजापुर महामार्गाच्या 110 कि.मी.चे काम सुरू आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण होईल," असे गडकरी यांनी ट्विट केलेते पुढे म्हणाले की हा महामार्ग दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडतो आणि त्याचा विकास राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमाच्या उत्तर-दक्षिण कॉरिडोरला पर्यायी मार्ग म्हणून काम करेल.
लवकरच खासगी रुग्णालयातही होणार कोरोनाची लस उपलब्ध; जाणून घ्या काय असेल किंमत
“सोलापूर, विजापूर येथे बायपाससह चौपदरीकरणाच्या विकासामुळे व सहा उड्डाणपुलांच्या निर्मितीमुळे प्रवासाचा वेळ आणि वाहनांचा खर्च कमी होईल तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पायाभूत सुविधांच्या सुधारणेत मदत होईल,” असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एनएचएआयने विजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान गुरुवारी धुळके, होराटी तांडा आणि तिडागुंडी या पाच वेगवेगळ्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम हाती घेतले. या पाचपैकी तीन ठिकाणे कर्नाटकात असून उर्वरित दोन महाराष्ट्रात आहेत.