Ludhiana Court Blast प्रकरणातील आरोपी हरप्रीत सिंह गजाआड, NIA ने...

Harpreet Singh News: लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी मलेशिया याला अटक करण्यात आली आहे.
Harpreet Singh
Harpreet Singh Dainik Gomantak

Harpreet Singh Arrest: लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी मलेशिया याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने आरोपी हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी मलेशियाला दिल्ली विमानतळावरुन अटक केली आहे. आरोपी हरप्रीत सिंग मलेशियाहून भारतात परतत असताना एनआयएने त्याला अटक केली.

एनआयएने आरोपी हरप्रीत सिंगला अटक केली

आरोपी हरप्रीत सिंग हा मूळचा पंजाबमधील अमृतसर येथील अजनाला भागातील आहे. मलेशियातील (Malaysia) क्वालालंपूरहून नवी दिल्लीला परतल्यानंतर दहशतवादी (Terrorist) हरप्रीत सिंगला विमानतळावरच अटक करण्यात आली.

लुधियाना न्यायालय परिसरात स्फोट झाला

लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला होता, तर 6 जण जखमी झाले होते. 23 डिसेंबर 2021 रोजी लुधियाना कोर्ट परिसरात स्फोट झाला होता. त्यानंतर 13 जानेवारी 2022 रोजी एनआयएने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Harpreet Singh
Jawaharlal Nehru University: 'ब्राह्मणविरोधी घोषणांनंतर जेएनयूमध्ये अलर्ट, 'तुकडे-तुकडे गॅंग...'

विशेष NIA न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते

विशेष म्हणजे, विशेष एनआयए कोर्टाने आरोपी हरप्रीत सिंगविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. याशिवाय त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर एनआयएने लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटातील आरोपी हरप्रीत सिंगला अटक केली आहे.

Harpreet Singh
Jawaharlal Nehru University: 'रक्तपात होणार...,' कॅम्पसमधील भिंतींवर ब्राह्मण विरोधी नारा

हरप्रीत सिंग अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे

एनआयएच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेला आरोपी हरप्रीत सिंग हा स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जच्या तस्करीसह अनेक प्रकरणांमध्ये सामील होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com