UP अन् केरळसह अनेक राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर NIA चे छापे

देशव्यापी छाप्यांमध्ये 100 हून अधिक शीर्ष PFI नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
NIA
NIADainik Gomantak

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गुरुवारी सकाळी अनेक राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ठिकाणांवर छापे टाकले आहे. उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये PFI विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करत छापे टाकण्यात आले आहेत. देशव्यापी छाप्यांमध्ये 100 हून अधिक शीर्ष PFI नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयए, अंमलबजावणी संचालनालय आणि राज्य पोलिसांनी एकत्रितपणे हे छापे टाकले.

यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 40 ठिकाणांवर छापे टाकले होते. एजन्सीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ही कारवाई केली होती. कानपूर हिंसाचार, दहशतवादी कारवाया करणे आणि धर्माच्या आधारे द्वेष पसरवणे असे अनेक आरोप पीएफआयवर आहेत. दिल्लीतील CAA आंदोलनापासून ते मध्य प्रदेशातील मुझफ्फरनगर, शामली आणि खरगोनमधील जातीय हिंसाचारापर्यंत ते पीएफआयशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.  

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची सुरुवात केरळमध्ये 2006 मध्ये झाली होती. PFI 2006 मध्ये तीन मुस्लिम संघटनांच्या विलीनीकरणानंतर अस्तित्वात आले. राष्ट्रीय विकास मोर्चा, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूच्या मनिता नीती पसरी या तीन संघटना होत्या. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर दक्षिणेत अशा अनेक संघटना समोर आल्या. त्यातील काहींचे विलीनीकरण करून PFI ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ही संस्था देशभरात कार्यक्रम आयोजित करते.

16 वर्षांच्या इतिहासात, PFI ने देशातील 23 राज्यांमध्ये युनिट्स असल्याचा दावा केला आहे. ही संस्था देशातील मुस्लिम आणि दलितांसाठी काम करते. ही संस्था मध्यपूर्वेतील देशांकडूनही आर्थिक मदत घेते, ज्यातून तिला भरीव निधी मिळतो. पीएफआयचे मुख्यालय कोझिकोडमध्ये होते, परंतु सततच्या विस्तारामुळे राजधानी दिल्लीत त्याचे केंद्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com