एनआयएकडून केरळमध्ये पाच ठिकाणी छापे

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

केरळ सोने तस्करीप्रकरणी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)ने मलापूरम आणि कोझिकोड येथे पाच ठिकाणी छापे घेतले.

नवी दिल्ली/कोची : केरळ सोने तस्करीप्रकरणी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)ने मलापूरम आणि कोझिकोड येथे पाच ठिकाणी छापे घेतले. मोहंमद अस्लम, अब्दुल लतिफ, नझीरुद्दीन शा, रमझान पी आणि महंमद मन्सूर यांच्या निवासस्थानी एनआयएने झडतीसत्र राबविले. या तपासात एनआयएच्या हाती महत्त्वाचे कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य लागल्याचे सूत्राने सांगितले.

याप्रकरणी एनआयएकडून आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. तिरुअनंतपूरम विमानतळावर ५ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १४.८२ कोटी रुपयांच्या ३० किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे.

संबंधित बातम्या