‘एनआयए’ उतरली मैदानात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याच्या नाड्या आवळण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मैदानामध्ये उतरली असून काश्‍मीर खोऱ्यातील दहा आणि बंगळूरमधील एका ठिकाणावर आज छापे घालण्यात आले. 

श्रीनगर :  दहशतवादी कारवायांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याच्या नाड्या आवळण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मैदानामध्ये उतरली असून काश्‍मीर खोऱ्यातील दहा आणि बंगळूरमधील एका ठिकाणावर आज छापे घालण्यात आले. 

काही स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्ट हे सामाजिक कार्याच्या नावाखाली जम्मू आणि काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांना रसद पुरवीत असल्याचे  लक्षात आल्यानंतर 
ही कारवाई झाली. यात अनेक दस्तावेज आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

खुर्रम परवेझ (जम्मू आणि काश्‍मीर सिव्हिल सोसायटी आघाडीचे समन्वयक) त्यांचे सहकारी परवेझ अहमद बुखारी, परवेझ अहमद मत्ता आणि बंगळूरमधील त्यांच्या सहकारी स्वाती शेषाद्री, बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या पालक संघटनेच्या अध्यक्ष परवीना आहनगर यांच्या कार्यालयांवर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. 

संबंधित बातम्या