कोरोनाचा कहर: अ‍ॅक्टिव रुग्ण संख्या असणाऱ्या 10 जिल्ह्यापैंकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली.

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याची तसेच देशाची चिंता वाढवत आहे. देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली मात्र कोरोना पिडितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती अगदी चिंताजनक आहे. सध्या कोरोनाच्या अ‍ॅक्टीव रुग्णसंख्येत महाराष्ट्र अव्वल असून 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली आहे.

‘’दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्येचा आकडा वेगाने वाढला आहे,'' असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. (Nine out of 10 districts with active patient number are in Maharashtra)

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली? वाचा निर्मला सीतारमण काय...

‘’याशिवाय मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरातमध्य़े दिवसाला 1700 रुग्ण तर मध्यप्रदेशात 1500 रुग्ण सापडत आहेत. गुजरातमधील सर्वाधिक रुग्णसंख्या सुरत, भावनगर, अहमदाबाद, राजकोट, वडोदरामध्ये आहेत. तर दुसरीकडे मध्यप्रदेशातील भोपाळ, इंदोर, उजैन, जबलपूर, बैतूलमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे,’’ अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, ‘’सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या 10 जिल्ह्यापैकी 9 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक औरंगाबाद, नांदेड, जळगाव, आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश होतो.’’

 

संबंधित बातम्या