Union Budget2021-22 : आरोग्यासाठी निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेची घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना, देशातील आरोग्य संदर्भातील पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी नवी योजना जाहीर केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना, देशातील आरोग्य संदर्भातील पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी नवी योजना जाहीर केली आहे. कोरोना साथीच्या परिस्थितीत देशातील आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी म्हणून 64,180 कोटी रुपयांच्या नवीन योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. 

निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा करताना, आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेमुळे देशातील प्राथमिक, माध्यमिक व तृतीयक क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेअंतर्गत, 17,000 हून अधिक ग्रामीण भागातील आणि 11,000 शहरी भागातील स्वास्थ्य केंद्रांना मदत होणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी यावेळेस दिली. 

Union Budget 2021: शेतक-यांना दिली जाणारी रक्कम वाढणार

आरोग्याच्या संदर्भातील पायाभूत सोयी-सुविधांच्या गुंतवणुकीत वाढ करण्यात येत असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. व या योजनेमार्फत प्रतिबंधक, उपचारात्मक आणि चांगले स्वास्थ्य या तीन गोष्टी अधिक बळकट करण्यावर लक्ष देण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केले. व यासाठी केंद्र सरकार द्वारा 64,180 कोटी रुपये खर्चून ही योजना पुढील आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त, आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेमुळे देशाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक क्षेत्रात सहा वर्षांमध्ये आरोग्य सुविधांचा विकास होणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्यानंतर ही नवीन योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानाव्यतिरिक्त राहणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. 

दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करताना यंदाचा बजेट हा सहा मुख्य आधार स्तंभावर आखण्यात आल्याचे सांगितले. आरोग्य आणि कल्याण, भौतिक-आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, महत्वाकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी भांडवलाची पुनरुज्जीवन, नूतनीकरण अनुसंधान व विकास, किमान सरकार आणि अधिक गव्हर्नन्स या मुख्य मुद्द्यांवर असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.      

        

संबंधित बातम्या