अंबानी कुटुंबात एका नविन चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका नविन चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याला पुत्ररत्न झालं आहे. आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिने एका गोंडस बाळाला आज सकाळी 11 वाजता जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका यांचं 9 मार्च 2019 रोजी लग्न झालं होतं. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

अंबानी कुटुंबाच्या वतीने एका प्रवक्त्यांनी या गोड बातमीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंब खूप आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहर घेऊन आला आहे."

 

 

संबंधित बातम्या