निवडणुकीचा निकाल पाहून ममतांना बसेल करंट; वाचा कोण म्हणालं असं

दैनिक गोमन्तक
बुधवार, 3 मार्च 2021

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आणि त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 27 मार्चला सुरु होणार आहे. यानंतर केरळ मध्ये 6 मार्च, आसाम मध्ये 27 मार्च, पुद्दुचेरी 6 एप्रिल आणि तमिळनाडू मध्ये 6 एप्रिल रोजी मतदान सुरु होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आणि त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 27 मार्चला सुरु होणार आहे. यानंतर केरळ मध्ये 6 मार्च, आसाम मध्ये 27 मार्च, पुद्दुचेरी 6 एप्रिल आणि तमिळनाडू मध्ये 6 एप्रिल रोजी मतदान सुरु होणार आहे. तर सर्व राज्यांमधील निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. त्यातल्या त्यात पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहायला लागल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. व भारतीय जनता पक्षाने आपला सगळा जोर पश्चिम बंगालवर एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी आज पश्चिम बंगालच्या जोयपूरमध्ये एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर तुफान टीका केली आहे. तसेच नितीन गडकरी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजे 2 मे ला पश्चिम बंगाल मध्ये कमळ फुलणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यानंतर पुढे 3 मे ला भाजपचा नेता निवडला जाईल आणि 4 मे ला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगत, याला कोणीही रोखू शकत नसल्याचे नितीन गडकरी म्हणाले. याशिवाय, मतदानाच्या दिवशी सकाळी जागे सर्वांनी जागे होऊन, आपल्या देवाची आठवण करावी आणि मतदान केंद्रावर जाऊन कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.   

भारत बायोटेकने बनवलेली 'कोव्हॅक्सीन' 81 टक्के प्रभावशाली

याव्यतिरिक्त, नितीन गडकरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना, निकालाच्या दिवशी म्हणजे 2 मे ला निवडणुकीचा निकाल पाहून ममता बॅनर्जी यांना असा करंट लागेल की त्या आपल्या खुर्ची वरून दोन फूट वर उठणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी केलेल्या टिकेवरून ममता बॅनर्जी या काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठीचे मतदान आठ टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च रोजी, दुसरा 1 एप्रिल, तिसरा 6 एप्रिल, चौथा 10 एप्रिल, पाचवा 17 एप्रिल, सहावा 22 एप्रिल, सातवा 27 एप्रिल आणि आठवा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर सध्याच्या घडीला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर आहे.        

       

संबंधित बातम्या