बिहारमधील पूल का कोसळला? अधिकाऱ्यांनी दिला अजब तर्क

बिहारमधील (Bihar) सुलतानगंजमध्ये बांधकामाधीन पूल कोसळण्याला तीव्र गतीने वाहणारा वारा जबाबदार असल्याचा अजब तर्क वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलायं.
बिहारमधील पूल का कोसळला? अधिकाऱ्यांनी दिला अजब तर्क
BiharDainik Gomantal

बिहारमधील सुलतानगंजमध्ये बांधकामाधीन पूल कोसळण्याला तीव्र गतीने वाहणारा वारा जबाबदार असल्याचा अजब तर्क वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलायं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी यासंबंधी माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांचा हा तर्क ऐकून गडकरींनी आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, 29 एप्रिल रोजी सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या पुलाचा काही भाग वादळी वाऱ्यादरम्यान कोसळला. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इथे एका आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, 'बिहारमध्ये (Bihar) 29 एप्रिल रोजी पूल कोसळला होता. यासंबंधी सेक्रेटरीला याचे कारण विचारले असता त्याने उत्तर दिले की, जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा पूल कोसळला.'

Bihar
मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयात स्फोट

तसेच, आयएएस अधिकारी अशा स्पष्टीकरणावर विश्वास कसा ठेवू शकतो, असा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना पडला. गडकरी म्हणाले, "वारा आणि धुक्यामुळे पूल कसा कोसळतो हे मला समजत नाही. काहीतरी चूक झाली असावी, ज्यामुळे हा पूल कोसळला असेल.''

Bihar
गुप्तचर संघटनांची दिल्लीत महत्वाची बैठक,या विषयांवर झाली चर्चा

शिवाय, कार्यक्रमादरम्यान गडकरींनी गुणवत्तेशी तडजोड न करता पूलांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्याच्या गरजेवर भर दिला. बिहारमधील सुलतानगंज आणि अगुआनी घाट दरम्यानच्या या पुलाचे काम 2014 साली सुरु झाले. त्याचे बांधकाम 2019 मध्येच पूर्ण होणार होते, परंतु अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com