नितीन गडकरींच्या मंत्रालयाने केला नविन विक्रम; 24 तासात बनविला तब्बल 2580 मीटर लांबीचा रस्ता   

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयातंर्गत 24 तासात सर्वाधिक लांबीचा रस्ता बनवुन एक नविन विक्रम तयार केला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयातंर्गत 24 तासात सर्वाधिक लांबीचा रस्ता बनवुन एक नविन विक्रम तयार केला आहे. ग्रीनफील्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई हा आठ लेन महामार्गवर काम करत असताना विक्रम केला असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

राजमार्गावर 24 तासात 2580 मीटर लांबीचा पेव्हमेंट क्वालिटीचा काँक्रिट रस्ता बनवण्याचा रेकॅार्ड बनविला आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजल्यापासुन दुसऱ्या दिवसी सकाळच्या 8 वाजेपर्यत रस्ता पुर्ण केला व एक जागतिक विक्रम तयार केला आहे. एनएचएआयचे ठेकेदार पटेल यांच्या जागतिक विक्रमाला इंडीया बुक आफ रेकॉर्डला मान्यता दिली आहे.

‘सर्वांनी देशाच्या एकतेची शपथ घ्यावी’

ग्रीनफील्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई ही 8 लेन राजमार्ग परियोजना आहे. हा राजमार्ग ऑटोमॅटिक टाकणाऱ्या मशीनने बनविला आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2020 पासुन 12 जानवारी 2021 पर्यत प्रतिदिन 26.16 किमी या गतीने 8196 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय  महामार्ग निर्माण करुन आता पर्यतचे रेकॅार्ड मोडला आहे.

नितीन गडकरी यांच्या कडे 2014 पासुन  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग खाते आहे. त्यांच्या नेतृत्वात रस्त्यांचा चांगला विकास होत आहे. म्हणुन त्यांच्याकडे २०१९ नंतर देखील पुन्हा तेच खाते देण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षीत 26.11 कि.मी गतीने 7573 की.मी राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात आला आहे. त्या सरासरी नुसार चालु आर्थिक वर्षात 11,000  कि.मी महामार्ग निर्माण होऊ शकतो अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.

 

संबंधित बातम्या