नितीशकुमारांचा शपथविधी उद्या

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते.

पाटणा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३० वाजता एनडीएची बैठक बोलावली असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचदिवशी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.

आजच्या बैठकीत जेडीयूकडून नितीशकुमार, विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि अशोक चौधरी यांनी सहभाग घेतला. तर भाजपकडून सुशीलकुमार मोदी, नित्यानंद राय, संजय जयस्वाल आणि हम पक्षाच्या वतीने जीतनराम मांझी आणि व्हीआयपीकडून मुकेश सहानी उपस्थित होते. काल सायंकाळी नितीशकुमार यांनी जनता हेच खरे मालक असून आतापर्यंत कोणत्याच मुद्द्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे म्हटले होते. रविवारच्या बैठकीत रणनिती आखली जाणार आहे. 

संबंधित बातम्या