देशाच्या विरोधात विचारसरणी नको : नरेंद्र मोदी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

कोणतीही विचारसरणी देशहितापेक्षा मोठी नाही. आपल्या विचारसरणीचा अभिमान अवश्य बाळगावा. मात्र ती राष्ट्राच्या मुद्द्यांवर देशासोबत दिसावी. देशविरोधात असता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवाशक्तीला केले

नवी दिल्ली : कोणतीही विचारसरणी देशहितापेक्षा मोठी नाही. आपल्या विचारसरणीचा अभिमान अवश्य बाळगावा. मात्र ती राष्ट्राच्या मुद्द्यांवर देशासोबत दिसावी. देशविरोधात असता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवाशक्तीला केले. निमित्त होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरणाचे. 
मोदींच्या हस्ते पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांशी मोदींनी संवाद साधला. शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निःशंक, जेएनयूचे कुलगुरू एम.जगदीशकुमार यांच्यासह विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. मागील वर्षी विद्यापीठात शुल्कवाढीविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे नुकसान झाल्यामुळे हा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. 

देश आत्मनिर्भर बनण्याच्या संकल्पनेसोबत पुढे जात आहे. आत्मनिर्भरची व्याप्ती मोठी आहे. संसाधनांसोबतच विचार आणि संस्कारांमध्ये आत्मनिर्भरता असेल तेव्हाच देश आत्मनिर्भर बनतो, असे सांगून मोदींनी सरकारच्या सुधारणांमुळे राजकारणात झालेल्या बदलावर संशोधनाचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. आतापर्यंत सुधारणा बॅड पॉलिटिक्स मानल्या जात होत्या. आता त्या गुड पॉलिटिक्समध्ये बदलल्या आहेत. हे कसे झाले यावर जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, असा त्यांनीमोदींनी दिला. 
जेएनयूमधील साबरमती ढाब्याचा आणि चहा - पराठ्यांसोबत होणाऱ्या चर्चेचा उल्लेख मोदींनी केला. 

आंदोलनाबाबत टिप्पणी
स्वातंत्र्य आंदोलन, आणीबाणी विरोधातील आंदोलनाची उदाहरणे देऊन मोदी म्हणाले, की या आंदोलनांमध्ये कोणालाही 
आपल्या विचारसरणीशी तडजोड करावी लागली नाही. फक्त 
राष्टहीत हेच उद्दिष्ट होते. 
राष्ट्रहिताचा मुद्दा असेलतर विचारसरणीच्या ओझ्याखाली निर्णय घेतला तर नुकसानकारक ठरू शकते. स्वार्थासाठी विचारसरणीशी तडजोड घातक आहे.

संबंधित बातम्या